Durga: 'आई तुळजाभवानी' नंतर कलर्स मराठीवर नव्या मालिकेची घोषणा; झीवरील अभिनेत्री झळकणार मुख्य भूमिकेत
New Marathi Serial Update: छोट्या पडद्यावर सध्या अनेक नव्या मालिकांची चलती आहे. नव्याने आलेल्या मालिकाही प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहेत. अशातच कलर्स मराठी वाहिनीवर देखील सध्या अनेक बदल झाले आहेत. काही मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. तर काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. कलर्सवर नव्याने आलेल्या बिग बॉस मराठीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यातच काही दिवसांपूर्वीच कलर्सवरील 'महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी' या मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेचा पहिला प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला. आता त्यापाठोपाठ आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कलर्स मराठीने त्यांच्या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेचं नाव 'दुर्गा' असून झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' या मालिकेतील अभिनेत्री यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'तू तेव्हा तशी' मालिकेतील राधा म्हणजेच अभिनेत्री रुमानी खरे ही मालिकेत दुर्गाच्या भूमिकेत दिसत आहे. तर 'रंग माझा वेगळा' फेम अंबर गणपुळे यात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे. तर 'ठरलं तर मग' फेम शिल्पा नवलकरदेखील मालिकेत आहेत. वृंदा गजेंद्र आणि राजेंद्र शिरसाटकर देखील मालिकेत मुख्य पात्रांमध्ये दिसत आहेत. या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला आहे कलर्सने हा प्रोमो शेअर करत लिहिलं, 'आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणाऱ्या मुलीची कथा! येतेय नवी कोरी गोष्ट ‘दुर्गा’ लवकरच फक्त आपल्या कलर्स मराठी वर!'
यात दुर्गा तिच्या स्कुटीवरून घरात येतेय मात्र तिच्या आईला तिचा विसर पडला आहे तर बाबांचं निधन झालं आहे. आणि ज्यांच्यामुळे आपल्या घराची वाताहत झाली आहे त्यांना धडा शिकवण्यासाठी दुर्गा प्रयत्न करतेय. हा प्रोमो पाहून अनेक नेटकऱ्यांनी आणि कलाकारांनी प्रतिक्रिया देत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही मालिका कधीपासून सुरू होणार याबद्दल काहीही सांगण्यात आलं नसलं तरी प्रेक्षक मालिका पाहण्यास उत्सुक आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.