

COLORS SERIAL GOING OFF AIR
ESAKAL
गेल्या वर्षभरात छोट्या पडद्यावर अनेक मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यातल्या काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या तर काही मालिकांना प्रेक्षकांनी नाकारलं. ज्यामुळे टीआरपी कमी असल्याने या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता कलर्स मराठीवरील अशीच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असं म्हटलं जातंय. मालिकेतील अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर केलेली पोस्ट या चर्चेचं कारण ठरलीये. ही मालिका सुरू होऊन वर्ष देखील पूर्ण झालं नाहीये. ही मालिका आहे अशोक सराफ यांची 'अशोक मा. मा.' दुसरीकडे कलर्सने अशोक मामांचा आणि निवेदिता यांचा एक पोस्टर शेअर केलाय.