

baipan jindabad
esakal
छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यातल्या काही प्रेक्षकांच्या मनात घर करतात. तर काही मालिका प्रेक्षकांना मुळीच पसंत पडत नाहीत. त्यांच्याकडे प्रेक्षक पाठ फिरवतात. टीआरपी कमी असल्याने या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात. अशातच कलर्स मराठीवर नुकतीच एक नवी मालिका सुरू करण्यात आली. एक आगळा वेगळा विषय घेऊन आलेली 'बाईपण जिंदाबाद' ही मालिका आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. विशेष म्हणजे दररोजच्या सिरीयलवर तोडगा असल्यासारखं ही मालिका फक्त रविवारी दाखवण्यात येतेय. पाहा मालिका पाहून काय म्हणाले प्रेक्षक?