

colors marathi
ESAKAL
छोट्या पडद्यावर सगळ्यांचं मनोरंजन करणाऱ्या अनेक वाहिन्या आहेत. यावर प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका दाखवल्या जातात. एखाद्या मालिकेत किंवा कथाबाह्य कार्यक्रमात काही चुकीची गोष्ट दाखवण्यात आली तर वाहिन्यांकडून अधिकृत माफीनामा प्रसारित केला जातो. आता अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी लोकप्रिय वाहिनी कलर्स मराठीनेदेखील प्रेक्षकांची माफी मागणारा एक अधिकृत माफीनामा प्रदर्शित केलाय. हा माफीनामा पाहून प्रेक्षकांना सुरुवातीला धक्काच बसला होता. मात्र नंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमललं.