
Entertainment News : सध्या मुस्लिम समाजाचा रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. अभिनयातून राजकारणात प्रवेश केलेला साऊथ इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता थलपती विजय पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. सुन्नी समाजाने विजय थलपती आणि आयोजकांविरुद्ध इफ्तार कार्यक्रमात दारुडे आणि गुंडांना सहभागी होऊ दिल्यामुळे मुस्लिम समाजाचा अपमान झाला आणि म्हणून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुस्लिम संघटनेने असाही आरोप केला आहे की उपस्थितांना पशूंसारखे वागवलं गेलं.