
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या मालिका प्रेक्षकांना त्यांच्या रहाटगाडग्यातून थोडा विरंगुळा मिळवून देतात. आताचे प्रेक्षक सुजाण झाले आहेत. त्यांना खोटं आणि खरं यातला फरक कळतो. मात्र काही प्रेक्षक तर या मालिका खऱ्याच आहेत असं समजून वागतात. असेच एक मालिकेचे गोड चाहते थेट आपल्या आवडत्या पात्राची विचारपूस करायला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. ही मालिका आहे सन मराठीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' आणि ते पात्र आहे मंजूचं.