Crew|Choli Ke Peeche : ‘क्रू’ चित्रपटात ‘चोली के पीछे क्या है’ गाणे !

दिग्दर्शक राजेश कृष्णन यांचा ‘क्रू’ हा चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये करिना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन या हिंदी चित्रपटातील आघाडीच्या नायिका एकत्र आल्या आहेत.
Choli Ke Peeche  song
Choli Ke Peeche songSakal

दिग्दर्शक राजेश कृष्णन यांचा ‘क्रू’ हा चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये करिना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन या हिंदी चित्रपटातील आघाडीच्या नायिका एकत्र आल्या आहेत.

या तिघींच्या ग्लॅमरस लूकची चर्चा सगळीकडे असून आता ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘खलनायक’ या चित्रपटातील हे गाणे खूप लोकप्रिय आहे. आता त्या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन या चित्रपटात वापरण्यात आले आहे.

‘खलनायक’ चित्रपटात गायिका इला अरुण आणि अलका याज्ञिक यांनी हे गाणे गायले होते. यामध्ये माधुरीने तिच्या जबरदस्त अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. रिमिक्समध्ये करिनाने तिच्या स्वत:च्या शैलीने जादू केली आहे. तसेच या रिमिक्स व्हर्जनमध्ये गीतकार आणि संगीतकाराने स्वतःचे ट्विस्ट दिले आहे. सोबतच दिलजीत दोसांझचा पंजाबी टच गाण्याचा उत्साह वाढवणारा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com