
Bollywood News : गायक राहुल वैद्य गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे तो सतत करत असलेल्या विराट कोहली आणि त्याच्या चाहत्यांवरील टीकेवरून. विराटने इंस्टाग्रामवरून त्याला ब्लॉक केल्याचा दावा राहुलने केला आहे. इतकंच नाही तर अवनीत कौर प्रकरणावरूनही त्याने विराटची खिल्ली उडवली. त्यातच त्याने विराट आणि त्याच्या चाहत्यांना जोकर म्हटलं. यावरून विराटचा मोठा भाऊ विकासने त्याला खडेबोल सुनावले.