
Marathi Entertainment News : भारतीय सिनेसृष्टीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर अखेर चित्रपट साकारला जाणार आहे. आता प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आमिर खान आणि संवेदनशील चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी ही जबाबदारी उचलली आहे. या महत्त्वपूर्ण बायोपिकच्या वाटचालीत एक काळेकुट्ट वास्तवही दडलेलं आहे – अनेक निर्मात्यांनी केवळ ‘मसाला’ नसल्यामुळे हा प्रकल्प नाकारला होता.