

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही सध्या आघाडीची असलेली मालिका त्याच्या कथानकामुळे कायमच चर्चेत असते. या मालिकेत आता साक्षीनेच खून केल्याचं सिद्ध करण्याचं आव्हान अर्जुनसमोर आहे. तर साक्षीची केस दामिनी देशमुख ही प्रतिष्ठित वकील जिंकणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.