
dilip prabhavalkar
esakal
२०२५ मध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा थिएटरपर्यंत आणायची जादू घडवलीये दिलीप प्रभावळकर यांच्या 'दशावतार' सिनेमाने. सुबोध खानोलकर याच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'दशावतार' हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटामुळे चांगलीच गर्दी पाहायला मिळतेय. दशावतार चक्क बॉलिवूड चित्रपटांना टक्कर देतोय. अवघ्या सहा दिवसात या चित्रपटाने केलेली कमाई ही वाखाणण्याजोगी आहे. वीक डे असूनही या चित्रपटाने छप्परफ़ाड कमाई केलीये.