

dattu more
ESAKAL
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा लोकप्रिय अभिनेता दत्तू मोरे याने काही महिन्यांपूर्वीच ठाण्यात त्याचा नवा व्यवसाय सुरू केला होता. त्याचं नाव आहे 'डेली बाउल'. हे फूड स्टार्टअप आहे. यातून तो सगळ्यांना ताजं आणि पौष्टिक अन्न देतो. मात्र या बाऊलमधल्या पदार्थांवर काहींनी प्रश्न उपस्थित केलेत. सलाडमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या आणि फळं इतकी फ्रेश आणि रंगीत कशी आहेत असं म्हणत यात कृत्रिम रंग वापरला गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. आता यासगळ्यावर दत्तूने एक व्हिडिओ शेअर करत उत्तर दिलंय.