Pushpa 2esakal
Premier
'पुष्पा २'च्या शोदरम्यान मोठी घटना; मृतदेहासोबतच चित्रपट पाहत होते प्रेक्षक, बातमी समजताच थिएटरमध्ये खळबळ
Man Died During Pushpa 2 Live Show: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या 'पुष्पा २' च्या शोदरम्यान आणखी एक घटना समोर आली आहे.
दाक्षिणात्य अल्लू अर्जुन याचा 'पुष्पा २' नौकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. ७ दिवसांच्या आत या चित्रपटाने तब्बल ६०० कोटींहून अधिकची कमाई केलीये. अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत हा चित्रपट विजयी घौडदौड करतोय. मात्र एकीकडे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई होत असताना दुसरीकडे 'पुष्पा २' अनेक संकटात देखील फसताना दिसतोय. आता 'पुष्पा २'च्या शोदरम्यान थिएटरमध्ये मृतदेह आढळून आलाय.