

ZEE MARATHI SERIAL UPCOMING PLOTS.
ESAKAL
आपल्या आवडत्या मालिकांमध्ये पुढे काय घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नेहमीच असते. एखाद्या पात्राच्या मनात दडलेली भावना कधी व्यक्त होणार, एखादं रहस्य कधी उलगडणार किंवा मिशन यशस्वी होणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं. ‘झी मराठी’च्या मालिकांमध्ये या आठवड्यात अशीच उत्सुकता कायम ठेवणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घटना पाहायला मिळणार आहेत. ‘दीपज्योती’, ‘तारिणी’ आणि ‘देवमाणूस मधला अध्याय’ या मालिकांमध्ये प्रेम, संघर्ष, धाडस आणि रहस्य यांचा संगम पाहायला मिळणार आहे.