
मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सध्या अभिनयासोबत वेगळं काहीतरी करताना दिसतायत. त्यातही स्वतःचा बिझनेस सुरू करण्याकडे अनेकांचा कल आहे. यापूर्वी फार क्वचित कलाकार बिझनेस क्षेत्रात येताना दिसायचे. मात्र आता मराठी कलाकार स्वतःचा छोटासा का असेना पण व्यवसाय सुरू करताना दिसतायत. गेल्या वर्षभरात काहींनी स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड सुरू केलेला तर कुणी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. आता त्यात आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलंय. लोकप्रिय अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी स्वतःचं नवं हॉटेल सुरू केलंय.