

Deepika Padukone Cake Cutting:
Sakal
Deepika Padukone cake cutting video viral: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या अभिनयाने आणि स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकत असते. दीपिका पदुकोणने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही स्वतःची एक मजबूत ओळख निर्माण केली आहे. आज दीपिका पदुकोणचा 40 वा वाढदिवस आहे आणि या खास प्रसंगी चाहत्यांपासून ते स्टार्सपर्यंत सर्वजण दीपिकाला शुभेच्छा देत आहेत. विशेष म्हणजे दीपिका पदुकोणने तिचा वाढदिवस तिच्या फॅन्ससोबत साजरा केला आहे आणि तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. दीपिका पदुकोणचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीत.