
deepika padukone
esakal
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही बॉलिवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. तिचे बहुतेक चित्रपट हे हिटच्या यादीत आहेत. दीपिका शेवटची 'कल्की २८९८ एडी' मध्ये दिसली होती. त्यानंतर तिने तिची मुलगी दुवाला जन्म दिला. चाहते तिच्या 'कल्की २८९८ एडी'च्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता दीपिकाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर येतेय. दीपिकाला 'कल्की २८९८ एडी' मधून बाहेर केलं गेलंय. आता तिच्याजागी कोणती अभिनेत्री दिसणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.