

DEEPIKA PADUKONE FATHER CRUSH
ESAKAL
आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने नुकतीच तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली. त्यामुळे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मात्र दुसरीकडे तिच्या 'राका' चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न विचारले जातायत. ती पुन्हा एकदा ब्रेकवर जाणार का असा प्रश्न विचारला जातोय. या सगळ्यात दीपिकाचे वडीलदेखील चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे अभिनेत्रीने वडिलांचा सांगितलेला किस्सा. दीपिकाच्या वडिलांना एक बॉलीवूड अभिनेत्री खूप जास्त आवडत होती आणि तिचं लग्न झाल्यावर त्यांना खूप वाईट वाटलेलं. कोण होती ती अभिनेत्री?