Deepika- Ranveer Became Parents: लक्ष्मी आली! दीपिका- रणवीर झाले आई- बाबा; नेटकऱ्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

Ranveer Singh Deepika Padukone Blessed With Baby Girl: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आई- बाबा झाले आहेत.
deepika padukone blessed with baby girl
deepika padukone blessed with baby girl esakal
Updated on

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या होणाऱ्या बाळाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण आलाच. अभिनेत्रीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. गेले कित्येक महिने चाहते त्यांच्या बाळाची वाट पाहत होते. आता दीपिका रणवीर आई- बाबा झाले आहेत. दीपिका आणि रणवीर यांना कन्यारत्न झालं आहे. आज 8 सप्टेंबर 2023 रोजी दीपवीर आईवडील झाले आहेत. त्यांनी एक पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर त्यांच्या बाळाचा जन्म झाल्याने चाहते प्रचंड खुश आहेत.

नुकतेच एका दिवसापूर्वी दीपिका आणि रणवीर यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं होतं. त्यासोबतच ते माउंट मेरी चर्च येथेही गेले होते. यावेळी दीपिकाने साडी तर रणवीरने कुर्ता परिधान केला होता. त्यानंतर आज लगेच अभिनेत्रीला इस्पितळात दाखल करण्यात आलं. त्यांच्या पाठोपाठ अभिनेत्याचे आई- वडीलदेखील इस्पितळात पोहोचले होते. आता त्याच्या काही तासातच कलाकारांनी चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

दीपिका यापूर्वी'कल्की २८९८ एडी या चित्रपटात दिसली होती. आता गरोदरपणानंतर काही महिन्यातच दीपिका पुन्हा कामाला सुरुवात करणार असल्याचं बोललं जात आहे. तर रणवीर शेवटचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये दिसला होता.

deepika padukone blessed with baby girl
लेकाच्या संसारात नाक खुपसणाऱ्या जया बच्चन स्वतःच्या सासू- सासऱ्यांसोबत कशा वागायच्या? अमिताभही गप्प पाहत बसायचे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com