
deepika padukone
eskal
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘पद्मावत’ आणि ‘पठाण’सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच आयएमडीबीच्या ‘२५ इयर्स ऑफ इंडियन सिनेमा’ या अहवालात दीपिकाचे नाव चौथ्या क्रमांकावर झळकले; मात्र या यशाबरोबरच ती एका नवीन वादामुळे चर्चेत आली आहे. संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’मधून दीपिकाने माघार घेतली होती, कारण तिने आठ तासांच्या कामकाजाची अट ठेवली होती, अशी चर्चा आहे.