स्पिरिट सिनेमातून दीपिका पादुकोणला बाहरेचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अभिनेत्री तृप्ती डिमरीला स्पिरिट चित्रपटात दीपिकाच्या जागी रिप्लेस केलंय. याचाच राग दीपिकाला आला आणि तिने स्पिरिट चित्रपटाची स्क्रिप्टच व्हायरल केल्याचा आरोप संदीप रेड्डी वांगा यांनी केला आहे. संदीप वांगा यांनी यासंदर्भात ट्वीट करत दीपिकाचं नाव न घेता तिला सुनावलंय.