
devendra fadanvis akshay kumar
esakal
अभिनेता अक्षय कुमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक हलके-फुलके प्रश्न विचारले. मात्र, एका प्रश्नामुळे अक्षय कुमार चांगलाच ट्रोल होत आहे. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही असाच प्रश्न विचारला होता. अक्षय कुमार यांनी मोदींना “तुम्ही आंबा कसा खाता?” असा प्रश्न विचारला होता. दरम्यान, अक्षय कुमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले, “तुम्ही संत्रा कसा खाता?” फिक्की फ्रेम्स कार्यक्रमात अक्षय कुमार यांनी फडणवीस यांची ही मुलाखत घेतली.