
Marathi Entertainment News : सध्या सगळीकडे लग्नाचा सीजन जोरात सुरु झालीये. मराठी इंडस्ट्रीमधील काही सेलिब्रिटीज नुकतेच लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाची चर्चा सगळीकडे असतानाच आणखी एका मराठी अभिनेत्याने त्याच्या रिलेशनशिपची कबुली दिली. देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या लाईफ पार्टनरची ओळख सगळ्यांना करून दिली.