Upcoming Marathi Movie : हा अभिनेता साकारणार तेजस्विनीच्या आगामी सिनेमात मुख्य भूमिका; नव्या पोस्टरची होतेय चर्चा

Yek Number Movie Update :अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडितच्या आगामी येक नंबर सिनेमातील कास्टविषयी महत्त्वपूर्ण खुलासा करण्यात आला.
Yek Number
Yek Number Esakal
Updated on

Marathi Entertainment News : अभिनेत्री तेजस्विनी पंडित आता निर्मिती क्षेत्रात उतरली असून तिची निर्मिती असलेला नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येण्यास सज्ज झाली आहे. झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स यांची निर्मिती असलेला आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'येक नंबर' येत्या १० ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरने ही उत्सुकता अधिकच वाढवली. प्रेक्षकांना या पोस्टरमधील तरुण कोण, हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा होती. तर आता या गोष्टीवरून पडदा उठला असून हा सिनेमात दिसणार रांगडा तरुण आहे धैर्य घोलप.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com