

new entry in dhaktya sunbai
esakal
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक मराठी मालिकांची घोषणा करण्यात आली. त्यातील काही झी मराठीवर होत्या तर काही स्टार प्रवाहवर. झी मराठीवर काही दिवसं[पूर्वी एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. ही मालिका म्हणजे 'धाकट्या सुनबाई'. ‘कोठारे व्हिजन्स’च्या या नव्या मालिकेत अभिनेता मंदार जाधव मुख्य भूमिकेत आहेत. तर त्याच्यासोबत अभिनेत्री चिन्मयी मोरे मुख्य भूमिकेत आहे. मात्र यांच्यासोबत आणखी एका अभिनेत्रीची या मालिकेत एंट्री झालीये. ती म्हणजे लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नेहा कुलकर्णी. तिचं 'नुसती उठाठेव' या नावाने इंस्टाग्राम हँडल आहे. आता तिच्या इंट्रीची झलक समोर आलीये.