

DHANASHRI KADGAONKAR
ESAKAL
'तुझ्यात जीव रंगला' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री धनश्री काडगावकर आजही प्रेक्षकांची आवडती आहे. तिने वहिनीसाहेब बनून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. तिने साकारलेली खलनायिका चांगलीच गाजली. धनश्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या मालिकेच्या शूटिंगचा अनुभव सांगितलाय. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांची खूप गैरसोय व्हायची. मात्र तरीही त्या गावाने आणि शहराने आपल्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं असं ती म्हणालीये.