
Marathi Entertainment News : तुषार शेलार यांनी दिग्दर्शित केलेला ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज- भाग १’ हा चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी मराठीत प्रदर्शित झाला आणि या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. हाच चित्रपट २९ नोव्हेंबर रोजी हिंदीतही प्रदर्शित झाला असून, हिंदी प्रेक्षकही या सिनेमाचं भरभरून कौतुक करत आहेत, मराठी चित्रपटसृष्टीत अभूतपूर्व इतिहास घडवत हा चित्रपट केवळ एक कलाकृती न ठरता, प्रत्येक मराठी माणसाच्या भावनांशी जोडला गेला आहे.