

fess for ikkis
esakal
बॉलीवूडचा नवीन वॉर-ड्रामा चित्रपट 'इक्कीस' सध्या सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट चाहत्यांसाठी खूप भावनिक आहे, मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे. चित्रपटात धर्मेंद्र आणि अगस्त्य नंदा यांच्या अभिनयाचं कौतुक होत असलं तरी, कमाईचे आकडे चिंतेत टाकणारे आहेत. 'इक्कीस' चित्रपटाची निर्मिती तब्बल २०० कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. मात्र, रिलीजच्या पहिल्या ३ दिवसांत या चित्रपटाने केवळ १८.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. नवीन वर्षाच्या सुट्ट्यांचाही चित्रपटाला फारसा फायदा झालेला दिसत नाही.