

ikkis movie review
esakal
साडेतीन स्टार
दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी अंधाधून, मेरी ख्रिसमस असे काही यशस्वी चित्रपट केलेले आहेत. सस्पेन्स क्राईम थ्रिलर चित्रपट बनविण्यात त्यांचा चांगलाच हातखंडा आहे; परंतु आता त्यांचा प्रदर्शित झालेला ‘इक्कीस’ एक युद्धपट आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा जाॅनर त्यांनी हाताळला आहे. १९७१मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्धातील सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या सत्यकथेवर आधारित आहे. त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या लढाईमध्ये मोठे धाडस आणि शौर्य दाखविले होते. शत्रूचे रणगाडे नष्ट करताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारत सरकारने त्यांच्या कार्यासाठी परमवीर चक्र देऊन सन्मानित केले. त्यांच्याच शौर्याची आणि धैर्याची गाथा या चित्रपटामध्ये मांडण्यात आली आहे.