धीरेंद्र शास्त्रींना रितेशनं चांगलंच सुनावलं, म्हणाला...'आराध्य दैवताबद्दल कोणीही काहीतरी विकृत...'

DHIRENDRA SHASTRI CONTROVERSY:बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केले, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. रितेश देशमुख यांनी ट्विटरवर संताप व्यक्त करत या वक्तव्याला अमान्य आणि अस्वीकार्य म्हटले आहे.
RITESH DESHMUKH REACTS TO DHIRENDRA

RITESH DESHMUKH REACTS TO DHIRENDRA

esakal

Updated on

ACTOR RITESH DESHMUKH REACTS TO DHIRENDRA: बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल आहे. त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. धीरेंद्र शास्त्री नागपूरमधील भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, 'सततची युद्धे संघर्ष करुन छत्रपती शिवाजी महाराज खुप थकले होते. त्यांनी थकून आपला मुकुट समर्थ रामदास स्वामींच्या पायापाशी ठेवला. तसंच त्यावेळी ते युद्ध करायचं नाही. तुम्हीच हा राज्यकारभार सांभाळा अशी विनंती केली.'

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com