

PRAJAKTA DIGHE ON URMILA MATONDKAR
ESAKAL
'धडाकेबाज' मधून लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबतीने घराघरात गाजणारी कमळी असेल किंवा आता 'ठरलं तर मग' मधून प्रेक्षकांना भुरळ घालणारी कल्पना असुदे अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी नेहमीच आपल्या भूमिका चोखपणे निभावल्या. गेली अनेक वर्ष त्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलंय. त्या 'नरसिंम्हा' या गाजलेल्या चित्रपटातही दिसणार होत्या. मात्र काही कारणामुळे त्यांना तो चित्रपट नाकारावा लागला. आता त्यांनी त्यांची उर्मिला मातोंडकरसोबतची आठवण सांगितलीये जेव्हा अभिनेत्रीच्या वागणुकीमुळे त्यांना धक्का बसला होता.