
Bollywood Entertainment News : हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय प्रेरणा म्हणजेच अभिनेत्री श्वेता तिवारी कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहेत. आजवर श्वेताने दोन लग्न केली आणि तिची दोन्हीही लग्नं टिकली नाहीत. पण तिचे हे दोन्ही संसार कायमच वादग्रस्त ठरले. पण नुकतंच श्वेताने तिसरं लग्न केल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. श्वेता आणि अभिनेता विशाल आदित्य सिंहने लग्न केल्याचं म्हटलं जातंय. काय आहे या व्हायरल फोटोमागील सत्य जाणून घेऊया.