
NASHIBWAN SERIAL FIRST EPISODE
ESAKAL
छोट्या पडद्यावर नुकतीच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. ती म्हणजे स्टार प्रवाहवरील ''नशीबवान''. या मालिकेत अभिनेता आदिनाथ कोठारे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर त्याच्यासोबत अभिनेते अजय पुरकर, सोनाली बेंद्रेदेखील आहेत. अभिनेता अजय पूरकर यामध्ये 'नागेश्वर भोसले' हे खलनायकाचं पात्र साकारणार आहेत. या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्रु नेहा नाईक झळकतेय. नेहाने यापूर्वी मोठ्या पडद्यावर काम केलंय. १५ सप्टेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीये.