deepika padukone
deepika padukone esakal

अर्रर्रर्र खतरनाक! दीपिका पादुकोणची कोकणी ऐकलीत का? व्हिडिओ पाहून नेटकरी फिदा, एकदा ऐकाच

Deepika Padukone Talked In Konkani Langauge : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ती कोकणी भाषेत बोलताना दिसतेय.
Published on

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. दीपिका आणि रणवीर चाहत्यांचे आवडते आहेत. त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच आपल्या घरी एका चिमुकलीचं स्वागत केलंय. सप्टेंबरमध्ये दीपिका आणि रणवीर आई बाबा झालेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या चिमुकल्या मुलीचं नाव सांगितलं. दीपिका मुलीशी संबंधित काही रिल्सदेखील चाहत्यांसोबत शेअर करत असते. आपली मुलगी आपल्याला कुठलंही काम करू देत नाहिये असं तिने सांगितलं होतं. मात्र आता दीपिका एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होतोय ज्यात ती कोकणी भाषेत बोलताना दिसतेय. हा व्हिडिओ पाहून नेटकरी तिच्यावर फिदा झाले आहेत.

इंस्टाग्रामवर व्हायरल होणारा हा व्हिडिओ एका कार्यक्रमातला आहे. ज्यात दीपिकाची मुलाखत सुरू आहे. यात दीपिका मंचावर बसलीये. या कार्यक्रमात सूत्रसंचालक दीपिकाला कोकणी भाषेत प्रश्न विचारते. ती विचारते तू कशी आहेस? त्यावर ती कोकणी भाषेत म्हणते मी बरी आहे. सकाळी उठले, अंघोळ केली, नाश्ता केला, रेडी झाले आता इथे आलेय आणि आता मुलाखत देण्यासाठी तयार आहे. तिची ही कोकणी भाषा ऐकून तिथे उपस्थित सगळेच जोरजोरात ओरडू लागतात. तर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून सगळे तिच्यावर फिदा झालेत. दीपिकाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

deepika padukone
गीत बागडे ठरली 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३' ची महाविजेती; बक्षीस म्हणून मिळाली इतकी रक्कम

दीपिका ही मंगळूरची कोकणी भाषा बोलताना दिसतेय. तिचं बालपण कर्नाटक आणि बंगळूर येथे गेलं. त्यामुळे तिला तिथली कोकणी भाषा येते. तिच्या या भाषेवर नेटकरी तिचं कौतुक करताना दिसतायत. दीपिका नुकतीच 'सिंघम अगेन' या चित्रपटात दिसली होती. तर सध्या अभिनेत्री आईपणाचा आनंद घेतेय.

deepika padukone
स्टार प्रवाहवरील नवी मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' आहे 'या' मालिकेचा रिमेक; सुपरहिट ठरलेली आधीची सिरीयल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com