

BOLLYWOOD ACTRESS NAGMA LOOK THEN AND NOW
esakal
सिनेसृष्टीतील ट्रेंड दिवसागणिक बदलत असतो. त्यामुळेच ट्रेंडसोबत चालत राहणं ही काळाची गरज बनते. नाहीतर आपण आउटडेटेड होतो. सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे काळानुसार न चालल्याने मागे पडलेत. काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्याचा व्हिडीओसमोर आला होता जो वर्सोवा जेट्टीजवळ स्पॉट झालेला. मात्र अनेकांनी त्याला ओळखलंच नव्हतं. आता असाच एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात एका ९०च्या काळातील अभिनेत्रीला नेटकर्यांनी ओळखलं नाहीये. ती अभिनेत्री कधीकाळी इंडस्ट्रीची ड्रीम गर्ल होती. मात्र आज तिला पाहून ओळखणंही कठीण झालंय.