

millimeter from 3 idiots
esakal
'३ इडियट्स' हा चित्रपट प्रत्येक तरुणाच्या मनाला स्पर्श करणारा चित्रपट ठरला. मित्रांची साथ आणि कॉलेजमधली मस्ती यामुळे हा चित्रपट तरुणाईने डोक्यावर घेतला. यातील रँचोसारखं आपल्यालादेखील जगता यावं अशी आशा प्रत्येक तरुणाची होती. '३ इडियट्स' मधील आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. मात्र त्यांच्यासोबत आणखी एक पात्र होतं ज्याने आपल्या काही मिनिटांच्या भूमिकेतच प्रेक्षकांची मनं जिंकली. हे पात्र होतं मिलीमीटरचं. चित्रपट प्रदर्शित होऊन १६ वर्ष उलटली तरी हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता हा मिलीमीटर किती मोठा झालाय तुम्हाला ठाऊक आहे का? याच चित्रपटामुळे त्याला चक्क तुर्किश पत्नी मिळालीये.