
rohini hattangadi son
esakal
'चार दिवस सासूचे' मधून घराघरात पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी कायमच निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्या सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांपैकी आहे. त्यांच्या कुटुंबाबद्दल नेहमीच सगळ्यांना कुतूहल वाटत राहिलं. मात्र त्यांनी कधीही त्यांचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत येऊ दिलं नाही. काम आणि घर याचा समतोल त्यांनी सांभाळला. मात्र रोहिणी यांचा मुलगाही बॉलिवूडमध्ये नाम कमावतोय हे फार कमी जणांना ठाऊक आहे. रोहिणी हट्टंगडींच्या मुलाने बॉलिवूडमध्ये जम बसवलाय, अनेक मोठ्या कलाकारांसोबत त्याने काम केलंय.