

Abhang Tukaram Movie Review
esakal
Marathi Entertainment News : महाराष्ट्राच्या पावन भूमीला आजवर अनेक संत-महात्म्यांची सोबत लाभली आहे. संत-भक्ती चळवळीचा इतिहास आणि त्यातून उमगलेल्या अभंग-कीर्तन-भजनांची परंपरा अत्यंत समृद्ध आहे. या परंपरेत चिरंतन प्रेरणा देणाऱ्या अनेक संतांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांच्या भक्तिभावाने समाजात नैतिक मूल्ये, सामाजिक समता आणि आध्यात्मिक जागरुकता टिकवून ठेवली. संत परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण नाव म्हणजे संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज. तुकारामांचे अभंग म्हणजे त्यांच्या आत्म्याचा श्वास. अशा या थोर संत तुकाराम यांच्या जीवनातील एक वेगळा पैलू उलगडणारा चित्रपट म्हणजे ‘अभंग तुकाराम... कथा संत तुकारामांच्या गाथेची.’