रणपति शिवराय - स्वारी आग्रा : धाडस आणि शौर्याची थरारक कथा

Ranpati Shivray Swari Agra Movie Review : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा रणपति शिवराय स्वारी आग्रा सिनेमा या आठवड्यात रिलीज झाला आहे. कसा आहे हा सिनेमा आणि याला किती मिळाले आहेत स्टार्स जाणून घेऊया.
Ranpati Shivray Swari Agra Movie Review

Ranpati Shivray Swari Agra Movie Review

esakal

Updated on

Marathi Movie Review : लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकमधील सहावे पुष्प 'रणपति शिवराय-स्वारी आग्रा' हा चित्रपट आता आणलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धाडसाची, मुत्सद्देगिरीची आणि त्यांच्या शौर्याची कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्रा भेट ही त्यांच्या स्वाभिमानाचा, जाज्ज्वल राष्ट्रनिष्ठेचा आणि कुशल नेतृत्वगुणांचे प्रतीक आहे. या आग्रा भेटीतून छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले की एखाद्या बलाढ्य शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर उत्तम बुद्धिचातुर्य आणि योग्य असे नियोजन यांची आवश्यकता असते. महाराजांची आग्रा स्वारी कशी झाली... त्यांनी कशाप्रकारचे नियोजन केले.. दगाबाज आणि धोकेबाज औरंगजेबाच्या हातावर कशा तुरी दिल्या.. त्याकरिता त्यांच्या धाडसी मावळ्यांची साथ कशी मिळाली... वगैरे बाबींचे चित्रीकरण या चित्रपटात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com