

ranpati shivray swari agra
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या तेजस्वी पराक्रमासोबत त्यांचे बुद्धिचातुर्य हा त्यांच्या संपूर्ण कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुत्सद्दी योद्धे होते. असंख्य मोहिमांमधून ते अनेकदा सिद्ध झाले आहे. महाराजांनी गनिमी कावा ही कूटनीती अत्यंत प्रभावीपणे वापरली. शत्रू सावध नसतानाच त्याच्यावर घाला घालायचा, ही पद्धत तर महाराजांनी अनेक वेळा अतिशय यशस्वीरीत्या वापरली. औरंगजेबाचं मुघल साम्राज्य सर्वात मोठं आणि मजबूत साम्राज्य मानलं जायचं. अशा या साम्राज्याला शिवाजी महाराजांनी केवळ जोरदार हादराच दिला नाही, तर मुघल सम्राट औरंगजेबाची झोपही त्यांनी उडवली.