
dilip prabhavalkar dashavtar
esakal
'श्रीयुत गंगाधर टिपरे' या मालिकेतून घराघरात लोकप्रिय ठरलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना नेहमीच चकीत केलंय. आपल्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी जीव ओतलाय. 'नारबाची वाडी', 'पंचक', 'मर्डर मिस्त्री', 'विटीदांडू' यांसारख्या सिनेमांसोबतच ते हिंदी चित्रपटातही दिसले. त्यांची 'लगे रहो मुन्नाभाई' मधली गांधीजींची भूमिका प्रचंड गाजली. राजकुमार हिराणींपासून ते संजय दत्त पर्यंत सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं. या वयातही त्यांचा अभिनयातील उत्साह वाखाणण्याजोगा आहे. त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'दशावतार' हा चित्रपट सध्या प्रेक्षकगृहात गाजतोय. त्यानिमित्ताने त्यांनी सकाळला मुलाखत दिली. त्यात बोलताना त्यांनी त्यांना कोकणातलं काय काय आवडलं हे सांगितलं आहे.