
RISHABH SHETTY ON DASHAVTAR
ESAKAL
हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी चांगलं ठरलं. या वर्षी अतिशय चांगले सिनेमे प्रदर्शित झाले ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यातलाच एक गाजणारा मराठी सिनेमा म्हणजे दिलीप प्रभावळकर यांचा दशावतार. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. सोबतच मराठी माणसाला जागं करण्याचं कामंही केलं. या चित्रपटातील लोकेशन, कथेची मांडणी आणि सिनेमॅटोग्राफी हे सगळं पाहून प्रेक्षकांनी या चित्रपटाची तुलना गाजलेला दाक्षिणात्य चित्रपट 'कांतारा'सोबत केली. आता या चित्रपटाची 'कांतारा'सोबत तुलना होत असल्याने त्यावर या चित्रपटाचा नायक आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी याने भाष्य केलं आहे.