

dashavtar on ott
esakal
कोकण, कोकणातील निसर्ग आणि कोकणातील प्रथा यांचा अनोखा संगम असलेला 'दशावतार' हा चित्रपट २०२५ मधला सर्वाधिक गाजणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. समीक्षकांचं कौतुक मिळवलं. 'दशावतार' या चित्रपटातील दशावताराच्या खेळाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. फक्त महाराष्ट्रच नाही तर जगभरातील प्रेक्षकांना 'दशावतार'ची भुरळ पडली. या चित्रपटात दिसणारी बाबुली मेस्त्रीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. या चित्रपटाची कथाही प्रेक्षकांना आवडली. सगळीकडे गाजलेल्या 'दशावतार'चं सगळीकडे कौतुक झालं. मात्र अजूनही तुमचा हा चित्रपट पाहायचा राहिला असेल तर बॉक्स ऑफिस गाजवणारा हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.