
dilip prabhavalkar dashavtar
ESAKAL
छोटा पडदा असो किंवा मोठा, मराठी असो किंवा हिंद, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारे लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांचा नवा चित्रपट. १२ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'दशावतार' ने प्रेक्षकांची झोप उडवलीये. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड केलाय. वयाच्या ८१ व्या वर्षी दिलीप प्रभावळकर या सिनेमात १० वेगवेगळ्या अवतारात दिसले. त्यांनी पाण्यातले सीनदेखील स्वतः केले. त्यांचा हा उत्साह अचंबित करणारा आहे. 'दशावतार' या सिनेमाने प्रदर्शनानंतरच्या ५ दिवसात तब्बल ६. ७ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात ते मालवणी भाषा बोलताना दिसतायत. मात्र त्यांना ही भाषा शिकावी लागली. ही भाषा शिकवणारादेखील त्यांच्यासोबत सेटवरच होता.