

dimple kapadia
ESAKAL
DIMPLE KAPADIA NANA PATEKAR FIGHT: आपल्या अभिनयाने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये (ENTERTAINMENT NEWS) आपलं स्थान निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर (NANA PATEKAR) यांनी अनेक हिट चित्रपटात काम केलंय. त्यांचे 'क्रांतिवीर', 'प्रहार' हे चित्रपट तर प्रचंड गाजले. या चित्रपटांमध्ये नानांसोबत अभिनेत्री डिंपल कपाडिया (DIMPLE KAPADIA) यांनी स्क्रिन शेअर केलेली. त्यांची जोडी मोठ्या पडद्यावर चांगलीच गाजली. डिंपल यांना कलमवाली बाई हे टायटल मिळालं. या सिनेमांदरम्यान नाना आणि डिंपल यांच्यात चांगली मैत्री असूनही अभिनेत्रीने नानांबद्दल असं काही वक्तव्य केलं जे ऐकून सगळेच चकीत झाले. नाना अत्यंत घृणास्पद व्यक्ती असून त्यांनी त्यांची वाईट बाजू खूप चांगल्या पद्धतीने लपवून ठेवलीये असं त्या म्हणालेल्या.