

aditya sarpotdar
esakal
मुंज्या', 'काकुडा', 'झोंबिवली' यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे त्यांच्या हॉरर सिनेमांसाठीच ओळखले जातात. त्यातही त्यांनी 'उलाढाल', 'क्लासमेट्स', 'फास्टर फेणे', 'सतरंगी रे', 'नारबाची वाडी', 'उनाड' अशा अनेक उत्कृष्ट चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. सध्या ते त्यांच्या 'थामा' या चित्रपटासाठी चर्चेत आहेत. त्यांच्या हॉरर चित्रपटांची जोरदार चर्चा होते. मात्र आता त्यांनी 'उलाढाल' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या क्रू मेंबरमधील कॉस्ट्युम डिझायनर मुलीला आलेल्या भयानक अनुभवाबद्दल सांगितलं आहे. या चित्रपटाचं शूटिंग मुकेश मिलमध्ये सुरू होतं.