
Bollywood News : बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण मुलीच्या जन्मानंतर बराच काळ ब्रेकवर आहे. सप्टेंबर महिन्यात दीपिकाने मुलीला जन्म दिला. त्यानंतर ती तिच्या मुलीच्या संगोपनात व्यस्त आहेत. तर तिचे चाहते तिच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत आहेत. आगामी काळात दीपिकाचे अनेक सिनेमे रिलीज होणार आहे. पण तिच्या एका सिनेमाविषयी महत्त्वाची अपडेट समोर येतेय.