

sanjay jadhav on daughters affairs
esakal
'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'रिंगा रिंगा', 'फक्त लढ म्हणा', 'चेकमेट' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक संजय जाधव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. संजय जाधव यांनी त्यांच्या लेकीबद्दल केलेल्या विधानाने आता नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपल्याला आपल्या लेकीचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत असं ते म्हणालेत. संजय जाधव त्यांची लेक ध्रीती हिच्यासोबत खूप जास्त जोडलेले आहेत. त्यांचं बापलेकीचं नातं कमी असून ते एकमेकांचे मित्र आहेत. मात्र बाप हा बाप असतो या उक्तीनुसार जेव्हा जेव्हा ध्रीती तिच्या बॉयफ्रेंड ना घरी घेऊन येते तेव्हा तेव्हा संजय जाधव त्यांना रिजेक्ट करतात.