

Entertainment News : भव्य सेट्स, कालातीत प्रेमकथा आणि सिनेमातील वैभव हे तीन शब्द जिथे एकत्र येतात, तिथे संजय लीला भन्साळींचं नाव अपरिहार्यपणे घेतलं जातं. ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ मधील लाहोर असो किंवा ‘रामलीला’मधील गुजरात भन्साळी यांनी नेहमीच पडद्यावर नवे विश्व निर्माण केले आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या प्रेक्षकांसाठी १९७० च्या दशकातील इटली मुंबईतच उभी केली आहे.