

Satish Rajwade Stopped Drama Show In Midway
esakal
Entertainment News : नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे. नुकताच या नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे रंगला होता. नाटक सुरू झाल्यानंतर काही ज्येष्ठ प्रेक्षक उशिरा नाट्यगृहात पोहोचले आणि त्यांच्या आसनव्यवस्थेमुळे प्रयोगात थोडासा व्यत्यय निर्माण झाला. मात्र यावेळी घडलेली एक गोष्ट उपस्थित रसिकांच्या कायम स्मरणात राहील अशी ठरली.